Type Here to Get Search Results !

जि.प.तरडगाव गट व पं.सं पाडेगाव गणातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तडवळे येथे कोपरा सभा पार पडली.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

जि.प.तरडगाव गट व पं.सं पाडेगाव गणातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तडवळे येथे कोपरा सभा पार पडली.





यावेळी उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

तडवळे ता.फलटण येथे तरडगाव जिल्हा परिषद गटाचे व पंचायत समिती पाडेगाव गणाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तरडगाव गटाचे  श्री.गिरीश बनकर व पाडेगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री.राहुल नरूटे यांच्या प्रचारार्थ फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण व बाबासाहेब खरात यांच्या अध्यक्षतेखाली कोपरा सभा पार पडली यावेळी बाबासाहेब खरात यांनी गेली ३० ते ३५ वर्ष श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या विकासकामांचा झंझावात तडवळेतील मतदारांच्या समोर मांडला.व श्रीमंत संजीवराजे यांना विधिमंडळात पहायचे असेल तर आपल्याला पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच जागा आपल्याला निवडणून आणाव्या लागतील त्या अनुषंगाने आपण सर्वजण एकजुटीने कामाला लागु.व निश्चय करु की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई व श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब,तरडगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार गिरीश बनकर, पाडेगाव पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार राहुल नरुटे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कोपरा सभेसाठी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग,आजी, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तडवळे गावचे माजी सरपंच यांनी केले 

Post a Comment

0 Comments