Type Here to Get Search Results !

सोनवडी खुर्द येथे कृषीदुतांनी शेतकऱ्यांना जीवामृत निर्मितीचे दिले प्रशिक्षण.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सोनवडी खुर्द येथे कृषीदुतांनी शेतकऱ्यांना जीवामृत निर्मितीचे दिले प्रशिक्षण.     


            


सोनवडी खुर्द,ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमाअंतर्गत दिले शेतकऱ्यांना जीवामृत निर्मितीचे प्रशिक्षण.     

 कृषीदुतांनी सुरुवातीला जीवामृत हे देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि सजीव मातीपासून बनविलेले नैसर्गिक द्रव खत आहे,व जे मातीची सुपिकता वाढवते आणि पिकांची वाढ सुधारण्यास उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांना महत्व  समजावून देण्यात आले.या उपक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ  यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे  यांनी यावेळी हा उपक्रम पार पाडला.

Post a Comment

0 Comments