Type Here to Get Search Results !

खराडेवाडी येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरा सभा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

खराडेवाडी येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरा सभा.




खराडेवाडी ता.फलटण येथे तरडगाव जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार गिरीश बनकर व फलटण पंचायत समिती पाडेगाव गणाचे शिवसेनेचे उमेदवार राहुल नरुटे यांच्या प्रचारार्थ खराडेवाडी येथे कोपरा सभा घेण्यात आली यावेळी फलटण कोरेगाव  विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण व बाबासाहेब खरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाराज साहेबांनी धोम बलकवडी धरण बांधले नसते तर पाईप लाईन द्वारे पाणी आले असते का.?

तडवळे ते सुरवडी साडे सात कोटीचा रस्ता हा महाराज साहेबांच्या माध्यमातुन पुर्ण करण्यात आला.

न्यु फलटण शुगर वर्क्स लिमिटेड हा बंद पडलेला साखर कारखाना एन सी एल टी (औद्योगिक न्यायालयाच्या) माध्यमातून मार्गी लावुन श्री दत्त इंडिया या सारख्या उत्कृष्ट ग्रुपकडे स्वाधीन करून शेतकऱ्यांचा व कामगारांचा प्रश्न मिटवला तसेच आशिया खंडातील सर्वात मोठा कमिंन्स कंपनी सारखा मोठा प्रकल्प आपल्या तालुक्यात आणला व त्यामुळे तालुक्यातील हजोरो युवकांच्या हाताला रोजगार मिळाला त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आर्थिक जीवनमान सुधारले.

आपल्या गावामध्ये खासदार किती वेळा आले हे तुम्हीच सांगा व तुमच्या गावाला किती निधी उपलब्ध करून दिला.व इंग्रजांची नीती वापरणारे हे विरोधक आहेत असे ही माजी आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले.

श्रीमंत रामराजे यांनी स्वतःच्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून अहो रात्र तालुक्यासाठी विकासाभिमुख बनले . महाराज साहेबांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम केले.

माजी खासदार यांनी ५ वर्षात फक्त रेल्वे आणली व त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला..?

 माजी खासदार यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आफीस फलटणला आणले परंतु त्याचा अधिक त्रास हा सर्वसामान्य जनतेला होऊ लागला आहे.

फलटण तालुक्याच्या विकासासाठी  निधी हा आम्ही खेचुन आणला परंतु माजी खासदार यांना केंद्रातुन १ ही रुपया आणता आला नाही परंतु आम्ही केलेल्या विकासकामांच्या वरच स्वतः चे लेबल लावण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला जात आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र टिळेकर (सर) यांनी केले या वेळी खराडेवाडी येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments