Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.




दि. ३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे या ठिकाणी क्रांतीज्योती महीला शिक्षण जननी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने फॅन्सी ड्रेस  स्पर्धा  व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यातील वेशभूषा परिधान केली होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कादंबरी खराडे ,इयत्ता पहिलीतील अनुश्री धुमाळ व दिया जाधव  यांनी स्वीकारले . अध्यक्ष निवड माही खराडे हिने केली तर अनुमोदन समृद्धी खराडे व आभार श्रेया भोसले या विद्यार्थ्यांनीने मानले.याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री.चांदगुडे सर,जगताप मॅडम, शिंदे मॅडम,बांडे सर , मोरे मॅडम  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच नेहमीच या शाळेतील सर्वच शिक्षक अतिशय उत्तम प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविताना दिसत आहेत, तडवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे काम हे कौतुकास्पदच आहे कार्यक्रमासाठी महिला पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments