सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
आळजापूर, ता. फलटण येथे श्री धावजी पाटील मंदिर सभामंडपाचा भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती ॥मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ॥ महाराजसाहेब यांच्या निधीतून मंजूर झालेल्या श्री धावजी पाटील मंदिर सभामंडपाचे भूमीपूजन दि. ५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास मा. जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमावेळी आळजापूर गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळाचे पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सभामंडपामुळे गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, महिला मेळावे तसेच विविध विकासकामांवरील चर्चा अधिक सुलभ होणार असून ग्रामविकासाच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक जीवन बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
याप्रसंगी मा. दत्ताबापू अनपट यांनी भविष्यातही अशाच अधिक विकासाभिमुख कामांसाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments