Type Here to Get Search Results !

सोनवडी खुर्द येथे कृषीदूतांकडून मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सोनवडी खुर्द येथे कृषीदूतांकडून मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.                                             




सोनवडी खुर्द,ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.                          


         या कार्यक्रमात कृषिदुतांनी फुलोरा अवस्थेतील मका वापरून उच्च दर्जाचे मुरघास कसे तयार करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकादरम्यान मुरघास तयार करण्याची प्रक्रिया, लागणारी साधने व पद्धती आणि मुरघास तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे पशुपालनात मोठा फायदा होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. मुरघास तयार केल्याने पशुधनाला पौष्टिक आहार मिळतो व दूध उत्पादनात वाढ होते. या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली.                                       


        या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ,प्रा.एस.वाय.लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे यांनी यावेळी प्रात्यक्षिक करून दाखवले.

Post a Comment

0 Comments