Type Here to Get Search Results !

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी शेतकय्रांनी सातत्याने माती परीक्षण करावे!कृषीदुतांचा शेतकऱ्यांना सल्ला.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी शेतकय्रांनी सातत्याने माती परीक्षण करावे!कृषीदुतांचा शेतकऱ्यांना सल्ला.


  

                                                                                


फलटण येथील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी दुधेबावी ता. फलटण येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

यावेळी कृषीदुतांनी सांगितले की, जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करावे तसेच पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते, त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील क्षारांचे प्रमाण आधीची माहिती मिळते याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तीन महिन्यांनी पूर्वी मातीचा नमुना पाठवावा. जमिनीची एकरूपता रंग, सुपीकता,खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून ५ ते १८ नमुना गोळा करावे. आदी विविध बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंतशिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रमअधिकारी प्रा. एन. ए. पंडित, AIA प्रमुख डॉ. जी. बी.अडसूळ, विषय विशेषज्ञ प्रा. जी. एस शिंदे यांच्यामार्गदर्शनाखाली कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मनेरी, श्रीराम मोहिते. यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.

Post a Comment

0 Comments