सह्याद्री निर्भिड न्यूज
सोमंथळी/ तानाजी सोडमिसे
डिस्कळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम.
फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रा.उ. का. का. 2025-26 आयोजित येथील उदयानदूत सपकाळ वेदांत, सोडमिसे अभिषेक, पवार आदित्य, मुळीक विराज, वाघ सिद्धेश, चितळकर सिद्धार्थ,यांनी डिस्कळ मध्ये क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. सरपंच श्री डॉ. महेश पवार, उपसरपंच मा.श्री संदीप कर्णे आदि उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक श्री. गुलाबराव काळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. दिनांक 2 जानेवारी 2026रोजी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये विजय पटकविलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. व या शाळेतील शिक्षक सौ.सुनीता यादव यांनी खेळाचे महत्व सांगितले. व यानंतर मा. सरपंच मा.श्री. डॉ.महेश पवार यांनी उद्यानदूत व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले. या सर्व उद्यानदुतांना उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण चे मा. प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे सर , डॉ. ए.आर पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments