Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयाच्या एमसीए विभागातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मुधोजी महाविद्यालयाच्या एमसीए विभागातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी.




 फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी  महाविद्यालयातील आयटी विभागाने मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन (एमसीए) या  नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करून फलटण तालुक्यातील युवकांना आयटी क्षेत्रामध्ये रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात आयटी विभागामध्ये झालेली आहे. याचा फायदा तालुक्यातील तरुणांनी घेऊन आपल्या करिअरच्या वाटा शोधण्याचे काम केले पाहिजे. नुकत्याच मुधोजी  महाविद्यालयामध्ये टीसीएस सारख्या नामांकित कंपन्यांनी कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिलेले आहेत. अशा सुवर्णसंधीचा फायदा आपल्या करिअरमध्ये घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयटी विभागातील एमसीए सारख्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती घेऊन त्यामध्ये आपला प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांनी गप्प न राहता आपल्याला एकापेक्षा जास्त अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी कशा निर्माण करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आयटी विभागाने मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन सारख्या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी प्राप्त केलेली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षेची (CET) माहिती विविध सोशल मीडिया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून तालुका व तालुक्यातील परिसरामध्ये पोहोचवण्यात येत आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी या परीक्षेला प्रविष्ट होऊन एमसीए  अभ्यासक्रमास आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेशासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन कॉलेजच्या आयटी विभागामध्ये दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयाकडे संपर्क करावा. असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या (IT) विभागाच्या  वतीने करण्यात येत आहे.





Post a Comment

0 Comments