Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयात एमसीए, बीसीए व बीबीए सीईटी परीक्षांसाठी निशुल्क नोंदणी प्रक्रिया सुरू.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

मुधोजी महाविद्यालयात एमसीए, बीसीए व बीबीए सीईटी परीक्षांसाठी निशुल्क नोंदणी प्रक्रिया सुरू.


फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या संगणक व व्यवस्थापक विभागात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी होणाऱ्या एमसीए, बीसीए व बीबीए सीईटी परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही नोंदणी पूर्णता निशुल्क करण्यात येत आहे या उपक्रमाचा लाभ इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम सर यांनी केले आहे.

प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन, अर्ज भरण्याची व संपूर्ण नोंदणी प्रक्रिया संगणक व व्यवस्थापन विभागात उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी माहिती कॉम्प्युटर व मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा सचिन लामकाने सर यांनी दिली.

सीईटी परीक्षेद्वारे एमसीए, बीसीए व बीबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मुधोजी महाविद्यालय संगणक व व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 

प्रा. सचिन लामकाने 9922011001 

प्रा. सचिन दोशी 9960355949

प्रा. अण्णासो बळीप 9421963704

Post a Comment

0 Comments