Type Here to Get Search Results !

निवडणूक काळात वापरली जाणारी शाई ही राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली आहे-निवडणुक अधिकारी फलटण

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

निवडणूक काळात वापरली जाणारी शाई ही राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली आहे-निवडणुक अधिकारी फलटण.





तरडगाव ता .फलटण येथील मतदान केंद्रावर बोटावर लावण्यात येणारी शाई ही लगेच निघून जात असल्याचे सह्याद्री निर्भिड न्यूजचे वृत्त प्रसिद्ध होताच निवडणूक अधिकारी फलटण यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की ही शाई राज्य निवडणूक आयोगाकडून आलेली आहे ,तसेच  केंद्रीय निवडणूक काळात सुद्धा हीच शाई पवारली गेली आहे काही ठिकाणी जर शाई जाण्याचे प्रकार घडत असतील तर आम्ही सतर्कतेने त्याच्याकडे लक्ष देऊ व योग्य ती उपाययोजना करू असे प्रतिपादन फलटण निवडणूक अधिकारी फलटण यांनी केले आहे.व मतदारांनी शाई लावल्यानंतर लगेच शाई पुसण्याचा प्रयत्न करू नये व मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व सर्व मतदार बंधू भगिनी यांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केलेले आहे

Post a Comment

0 Comments