Type Here to Get Search Results !

श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धा आणि महिलांच्या निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी हरिदास सावंत सर 

श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धा आणि महिलांच्या निबंध स्पर्धांचे बक्षिस वितरण.


 



श्री.ग.वि.भोसले प्रतिष्ठान - साखरवाडी आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धा आणि महिलांच्या निबंध स्पर्धांचे निकाल जाहीर...मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण:::::साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा ) येथील श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धा आणि महिलांच्या निबंध स्पर्धांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आणि मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. प्रतिष्ठानचे सदस्य श्री अमोल गणपतराव भोसले यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धेत कुमारी वैष्णवी रविंद्र माडकर , कुमारी स्वरांजली महेश गायकवाड आणि कुमारी प्रज्ञा हणमंत पवार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कुमारी दुर्वा महेश खराडे तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कुमारी दुर्वा प्रसाद कदम व शिवानी महादेव नरळे या मुलींनी प्राप्त केले. या स्पर्धेत साखरवाडी , मुरूम , जिंती , काळज , सोमेश्वर नगर , फलटण येथील एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचे परीक्षण श्री हरिदास सावंत सर यांनी केले. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ३०००  , द्वितीय क्रमांकासाठी रुपये २००० व तृतीय क्रमांकासाठी रुपये १००० अशी रोख रकमेची बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. 

८ मार्च या जागतिक महिला दिनी महिला विशेष निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्पर्धेसाठी ' अनाथांची माय...सिंधूताय - सिंधूताई सपकाळ एक संघर्ष यात्री ' हा विषय देण्यात आला होता.७०० शब्द मर्यादा असलेल्या या स्पर्धेत साखरवाडी आणि परिसरातून २५ महिला भगिनींनी सहभाग घेतला.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये ३५०० , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये २५०० आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये १५०० ठेवण्यात आले होते.शिवाय प्रत्येक सहभागी महिला भगिनींना साडी व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सौ सोनाली ऊमेश वारे व सौ भाग्यश्री राजू तावरे यांनी प्राप्त केले.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सौ गौरी रसिकराज भिसे व सौ अमृता आनंद कदम यांनी प्राप्त केले.तृतीय क्रमांकासाठी सौ रेश्मा सुरेश भोजने व सौ संगिता विशाल गावडे यांची निवड झाली.याशिवाय प्रतिष्ठान कडून सौ अश्विनी शंकर बोरकर , दिपाली हणमंत शिंदे आणि तृप्ती बालचंद भोजने या स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ३५० रुपये रोख रकमेची बक्षिसे देवून गौरविण्यात आले. दोन्ही स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गणपतराव भोसले, उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव भोसले आणि सचिव श्री हरिदास दिगंबर सावंत सर यांनी या दोन्ही स्पर्धांचे उत्तम आयोजन केले. स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री अरविंद विठ्ठल भोसले, सौ रेश्माताई संजय भोसले आणि सचिव श्री हरिदास सावंत सर यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदस्य श्री सचिन चौगुले सरांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री सूरज अनंत गाडे यांचे उत्तम सहकार्य मिळाले. सहभागी सर्व स्पर्धक , पालक  या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments