सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी हरिदास सावंत (सर)
श्री भवानीमाता मंदिर , साखरवाडी बाजारपेठ येथे श्रीराम नवमी उत्सव संपन्न.
साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा ) येथील श्री भवानीमाता मंदिरात आजचा श्रीराम नवमी उत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाने भजन सेवा केली.त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी अत्यंत सुरेल पाळणा गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली .श्री अरविंद किंकर व सौ गायत्रीताई किंकर यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली.त्यानंतर रामरक्षा म्हणण्यात आली.फुले वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.अत्यंत नियोजनबद्ध संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन श्री नवरात्र शार दोत्सव मंडळाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांनी केले.श्री अरविंद किंकर , सूरज गाडे , रसिकराज भिसे , राजेंद्र देशपांडे , राजेंद्र वणवे , रमेश कुचेकर इत्यादी सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments