सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
पाणी उशाला आणि कोरड घशाला..! खामगाव ग्रामपंचायतीचा अजब कारभार..
ग्रामसेवकांची खामगाव मधून बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी.
खामगाव ता. फलटण येथील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून गेले आठ ते दहा दिवस पाणी येत नसल्याने खामगाव गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत ग्रामसेवक व ग्रामपंचायत नावाला उरली असून प्रशासन पण गांधारींच्या भूमिकेत आहे ना टँकरची व्यवस्था ना पाणी प्रश्न सोडवन्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन ची धावपळ
गेल्या पाच वर्षापासून ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर जैसे थे परिस्थिती आहे त्यावर खर्च करण्यासाठी व यंत्रणा चालवण्यासाठी पण हे प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्याचे मनावर घेत नाहीत ग्रामसेवक जाधव व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यावर कोणताच अंकुश न राहिल्याने ग्रामसेवक यांची या गावातून बदली करावी अशी ग्रामस्थांची ची मागणी होत आहे.. त्यातच गटविकास अधिकारी बोंबले यांच्याकडे तक्रार करून सुद्धा हे गटविकास अधिकारी कुठल्याही प्रकारचे सहकार्य दर्शवत नाहीत गट विकास अधिकारी हे दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार असल्याने फक्त दिवस ढकलण्याचे काम करत आहेत.
टि सी एल पावडर (Bleaching Powder/Calcium Hypochlorite) म्हणूनही ओळखले जाते, हे प्रामुख्याने निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे एक रासायनिक संयुग आहे याचा मुख्य उपयोग पाणी शुद्ध करणे, स्वच्छता राखणे आणि रोग पसरवणाऱ्या जंतूंचा नाश करण्यासाठी केला जातो परंतु याचा ही कित्येक दिवस वापर केला नसल्यामुळे पाण्यामध्ये शेवाळ साठुन पाणी अशुद्ध झालेले आहे. आरोग्य विभागाने कित्येक महिने तरी पाण्याची तपासणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे व त्याचा अहवाल ग्रामपंचायतकडे सादर केलेला नाही
या प्रकरणांमध्ये फलटण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
प्रशासनाने जर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर हा लढा आम्ही हातात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर हांडा मोर्चा उभा करु असे सामाजिक कार्यकर्ते दादा जाधव यांनी सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments