Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा महिला पोलीस संघास वंडर वुमन्स प्रीमीयर लिग क्रिकेट स्पर्धा - २०२६ चे विजेतेपद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

सातारा जिल्हा महिला पोलीस संघास वंडर वुमन्स प्रीमीयर लिग क्रिकेट स्पर्धा - २०२६ चे विजेतेपद.


दिनांक १०/०४/२०२६ ते १२/०४/२०२६ रोजी अॅस्ट्रोपॉड मैदान, सातारा येथे आयोजीत करण्यात

आलेल्या वंडर वुमन्स प्रीमीयर लिग क्रिकेट स्पर्धा - २०२६ च्या अंतिम सामन्यात सातारा जिल्हा महिला

पोलीस संघाने पॉवर क्वीन संघाचा दणदणीत पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले

श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्हा महिला पोलीस दलाचा

संघ स्पर्धेत सहभागी करुन प्रतिस्पर्धी संघासमारे एक तगडे आवाहन उभे केले. तज्ञ प्रशिक्षकांकडुन महिला

संघाला उत्कृष्ट प्रशिक्षण देवुन वेळोवेळी मागदर्शन केले. कुटुंबप्रमुखांनी आपल्यावर दाखवलेला

विश्वासाची परिपुर्ती करण्यासाठी सातारा जिल्हा महिला पोलीस संघाने अत्यंत परिश्रमपुवर्क सराव करुन

वंडर वुमन्स प्रीमीयर लिग क्रिकेट स्पर्धा - २०२६ चे विजेते पद प्राप्त केले. सातारा जिल्हा महिला पोलीस

संघामध्ये माया महामुलकर (कर्णधार), रोहिणी बाबर (उपकर्णधार), माधवी यादव, भाग्यश्री जाधव,

अश्विनी जाधव, पल्लवी शेंडगे, निकीता वाघ, दामिनी सपकाळ, प्राजक्ता ढेकळे, वनिता कोळपे यांचा

समावेश करण्यात आला होता. लिग मॅचेस च्या पहिल्याच सामन्यामध्ये रायजींग क्वीन संघाचा खरपुस

समाचार घेत कर्णधार माया महामुलकर व उपकर्णधार रोहीणी बाबर या दोघींनी आपली अर्धशतके पुर्ण

करुन ६ षटकांमध्ये तब्बल १३४ धावा करुन सहभागी संघाना सावधानतेचा इशार दिला. इतर सर्व

सामन्यांमध्ये आपला दबदबा कायम ठेवत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या महिला संघाने विजेतेपद प्राप्त

केले.

वंडर वुमन्स प्रीमीयर लिग क्रिकेट स्पर्धा - २०२६ मध्ये बेस्ट बॅट्समन व वुमन ऑफ द सिरीज हा

किताब संघाच्या उपकर्णधार रोहीणी बाबर यांनी, बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज चा किताब दामिनी सपकाळ

यांनी व अंतिम सामन्यामध्ये कर्णधार माया महामुलकर यांना प्लेअर ऑफ द मॅच चा किताब पटकावला.

मा. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हा महिला पोलीस दलाच्या उत्कृष्ठ

कामगिरीबद्दल संघाचे भरभरुन कौतुक करुन भविष्यात देखील अशीच उज्वल कामगिरी करणेची प्रेरणा

दिली. महिला संघास सुवर्णा काटकर महिला पोलीस उप निरीक्षक, सुनील सपकाळ (स्पोर्ट इन्चार्ज)

सॅम्युअल भोरे (सहाय्यक स्पोर्ट इन्चार्ज), अर्जुन शिरतोडे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments