Type Here to Get Search Results !

ढवळपाटी येथील युवकाच्या खुणातील आरोपींच्या डि बी पथकाने आवळल्या मुसक्या.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

ढवळपाटी येथील युवकाच्या खुणातील आरोपींच्या डि बी पथकाने आवळल्या मुसक्या.

गुन्हे शोध पथकाचे (डि बी) पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांची दमदार कामगिरी.





दि. 10/04/2026 रोजी रात्री 01.20 वा. चे सुमारास ढवळपाटी, वाखरी, ता. फलटण,

जि. सातारा येथील मि-याचीवाडी कमानीजवळ संदीप उमाजी जाधव, रा. मि-याचीवाडी

(दालवडी), ता. फलटण, जि. सातारा यांचा मुलगा सोमनाथ संदीप जाधव वय 18 वर्ष याचा

1. आदित्य विजय शिंदे 2. चिक्या लोखंडे 3. पिंट्या लोखंडे 4. ओम लोखंडे सर्व रा. ढवळ, ता.

फलटण, जि. सातारा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन व उचलुन आपटुन खुन

केल्याबाबतची तक्रार संदीप उमाजी जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे

दिल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 190/2026 भा. न्या. सं. 2023 चे कलम

103(1), 3(5) अन्वये दि. 10/04/2026 रोजी गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीमध्ये खुनाचे

कारण मयत सोमनाथ संदीप जाधव हा एका अल्पवयीन मुलीशी मोबाईल फोनद्वारे सोशल

मिडियाच्या माध्यमातून चॅटींग करीत असल्याच्या रागातून झाल्याचे नमुद आहे.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच परागंदा झालेले संशयित आरोपी 1. आदित्य विजयशिंदे, वय - 23 

2. तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे वय - 24 वर्ष

 3. प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे वय 22 वर्ष सर्व रा. ढवळ, ता. फलटण यांच्या ठावठिकाण्याची माहिती

घेऊन त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ओम लोखंडे सर्व

संशयित आरोपी 1 आदित्य विजय शिंदे, वय 23 वर्ष, रा. ढवळ, ता. फलटण यास

दि. 11/04/2026 रोजी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयात हजर केले

असता त्याची दि. 16/04/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. 2.

तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे वय - 24 वर्ष 3. प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे वय

22 वर्ष दोघे रा. ढवळ, ता. फलटण यांना दि. 13/04/2026 रोजी अटक करण्यात आली

आहे. त्यांना आज दि. 14/04/2026 रोजी मा. न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक

मा. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे सो यांच्या

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे

पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण,

पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, तुषार

नलवडे, हणमंत दडस व शिवराज जाधव यांनी सहभाग घेतला होता.


Post a Comment

0 Comments