सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सोशल मीडिया संशोधनासाठी डॉ.किशोर गांगुर्डे यांना पी एच डी .
राज्याची माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे यांना वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विषयातील पी एच डी जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ यांनी प्रधान केली व त्यांना कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी समाज बांधवांचा वापर आणि प्रभाव 'एक अभ्यास' या विषयावर गांगुर्डे यांनी संशोधन करून शोधप्रबंध सादर केला शासनाच्या लोकभिमुख योजना शासनाचे नगर शकत, धोरणे, लोकांपर्यंत पोहोचविण्यास सोशल मीडियाची भूमिका कोणती प्रभावी ठरते यांचे सखोल विश्लेषण या संशोधनात करण्यात आले संशोधनासाठी माध्यमशास्त्र प्रशाखेचे माझी संचालक सुधीर भटकर यांचे मार्गदर्शन लाभले. श्री किशोर गांगुर्डे यांना राज्य शासनाच्या जनसंपर्क व प्रसिद्धी विषयक कामाचा दोन दशकापासून प्रदीर्घ अनुभव आहे या विभागात त्यांनी केलेली सुरुवात ही उल्लेखनीय मानली जाते शासकीय माहिती प्रसारणासाठी प्रभावी वापर केल्याबद्दल 2018 मध्ये नागरी सेवा दिनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखील सन्मानित करण्यात आले होते.

Post a Comment
0 Comments