Type Here to Get Search Results !

श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान - साखरवाडी आणि जायंटस् ग्रूपच्या वतीने " महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी " या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी हरिदास सावंत (सर)

श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान - साखरवाडी आणि जायंटस् ग्रूपच्या वतीने " महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी " या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.




श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान, साखरवाडी आणि जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन ( साखरवाडी , फलटण , फलटण सहेली ) यांचे संयुक्त विद्यमाने साखरवाडी येथील श्री गणपती मंडपात बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता " महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी " या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.फलटण येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ नीलिमाताई दाते ( MBBS) , सौ अलकाताई पोळ ( MBBS  DGO) आणि  सौ जयश्रीताई उपाध्याय या वेळी मार्गदर्शन करणार असून स्त्रियांचे समुपदेशन , संबोधन , योगासने , प्राणायाम इत्यादी बाबींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. साखरवाडी परिसरातील सर्व महिला भगिनींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सचिन गणपतराव भोसले ( अध्यक्ष - श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान ,   साखरवाडी ) , श्री संजय गणपतराव भोसले ( उपाध्यक्ष - श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान, साखरवाडी ) , श्री हरिदास दिगंबर सावंत सर ( अध्यक्ष - जायंटस् वेल्फेअर फाउंडेशन , साखरवाडी आणि सचिव - श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान , साखरवाडी) , सौ सोनालीताई पवार ( पोलिस पाटील, साखरवाडी ) आणि सौ सीमाताई किशोर फडतरे ( संघटक - आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रूप , साखरवाडी) यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments