सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण इंजिनीअरिंग कॉलेजला 'स्वायत्त' दर्जा; नव्या अभ्यासक्रमांसह शैक्षणिक क्षितिजावर नवी झेप..
काळानुरूप नवीन अभ्यासक्रमांचा शुभारंभ
विद्यार्थ्यांची वाढती मागणी आणि आयटी क्षेत्रातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन महाविद्यालयाने आगामी शैक्षणिक वर्षापासून खालील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळवली आहे:
डिप्लोमा: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अँड डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML).
पदवी (Degree): आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हा नवीन कोर्स, तसेच डेटा सायन्स या विभागासाठी वाढीव तुकडीस मंजुरी मिळाली आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BATU), लोणेरे यांची 'एनओसी' प्राप्त झाली असून, एआयसीटीई (AICTE) समितीनेही या कोर्सेससाठी सकारात्मक शिफारस केली आहे.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि नवीन इमारत.
नवीन कोर्सेससाठी लागणारे उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर महाविद्यालयात सज्ज आहे. नुकतेच महाविद्यालयाच्या अद्ययावत नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले असून, यामध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स, हाय-स्पीड इंटरनेट, आधुनिक सेमिनार हॉल्स आणि समृद्ध ग्रंथालय यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
स्वायत्ततेमुळे विद्यार्थ्यांचा होणार फायदा.
'स्वायत्त संस्था' दर्जा मिळाल्यामुळे महाविद्यालयाला आता स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा मिळाली आहे. यामुळे उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम आखून विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांसोबत सहकार्य वाढवून दर्जेदार प्लेसमेंट मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. चालू वर्षापासून सर्व प्रवेश आता 'ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट' म्हणून केले जाणार आहेत.
मान्यवरांकडून कौतुक.
या ऐतिहासिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सर्व सदस्य आणि प्रशासन अधिकारी **अरविंद निकम यांनी प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले आहे.
स्वायत्त संस्था मान्यतेसाठी प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक म्हणून प्रा. शांताराम काळेल यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्रा. दिपाली जाधव, डॉ. दत्तात्रय शिंदे, प्रा. किशोरी कुमठेकर आणि प्रा. तेजश्री जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments