Type Here to Get Search Results !

मोटारसायकल चोरी करणारे आरोपींना फलटण शहर पोलीसांनी केले जेरबंद

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मोटारसायकल चोरी करणारे आरोपींना फलटण शहर पोलीसांनी केले जेरबंद.




फलटण येथील कसबा पेठ, ब्राम्हणगल्ली, गणेश अपार्टमेंट समोर पार्क केलेली ४५,०००/- रु.

किमतीची एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी क्रमांक MH.11.DJ 4487 ही दिनांक २६/०३/२०२६ रोजी

रात्रौ ११.३० ते दिनांक २७/०३/२०२६ रोजीचे सकाळी ०७.०० वा.चे दरम्यान चोरीस गेलेची तक्रार तक्रारदार

भारत काशिनाथ डोंबे वय ५५ वर्षे रा. २३०, कसबा पेठ, ब्राम्हणगल्ली, गणेश अपार्टमेंट फलटण ता. फलटण

जि. सातारा यांनी दिले तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.क्र.

११०/२०२६ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलचा व आरोपीचा शोध घेण्यासाठी मा.पोलीस

अधीक्षक सो सातारा श्री. तुषार दोशी सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक साो. डॉ. वैशाली कडुकर मॅडम,

मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे सो, यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात

वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे व

गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर घटनास्थळी भेट दिली. तपासारम्यान पोलीस निरिक्षक श्री. अरविंद काळे यांना

गोपनीय खब-यामार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी मिळाल्या माहीतीप्रमाणे तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाला

आरोपीच्या शोधाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने शोध घेऊन संश्रईत दोन आरोपी १) यश संदीप

ढालपे वय २३ वर्षे रा. शिवाजीनगर, गजानन चौक, फलटण ता. फलटण जि.सातारा २) प्रफुल्ल चंद्रकांत

हरीहर वय २६ वर्षे दोन्ही रा. मंगळवार पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा यांना ताब्यात घेतले. दोन्ही

आरोपींना अटक करुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता दोन्ही आरोपींनी सदर गुन्हयातील स्कुटी

चोरी केलेची कबुली दिली. आरोपींकडुन चोरी केलेली स्कुटी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन एक

विना नंबरची स्प्लेंडर मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपीना पोलीसांनी मा.

न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्हयाचे अधिक तपासकामी आरोपीना पोलीस कोठडी

सुनवली आहे. सदर गुन्हयाचा तपास म.पो.हवा. राणी फाळके ब.नं. ७७३ हया करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर मॅडम,

अप्पर पोलीस अधीक्षक सो.सातारा, श्री. विशाल खांबे सोो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग

यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, गुन्हे

प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, मुकेश घोरपडे, अतुल बडे, मपोहवा राणी फाळके यांनी पुर्ण केली आहे.

Post a Comment

0 Comments