सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी येथे वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई.
वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्यावर इथुन पुढे कठोर कारवाई करणारच- पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे
साखरवाडी ता.फलटण येथे अल्पवयीन, ट्रिपल सीट,विना वाहन परवाना यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिस वाहतूक शाखेकडुन आज साखरवाडी येथे कारवाई करण्यात आली यामध्ये अल्पवयीन, मद्यपान करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे, तसेच वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये कारवाई करिता महिला पोलीस उपनिरीक्षक नागवडे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाडवी, पोलीस हवालदार 1145 अरुण शेंडे पोलीस हवालदार 21 42 पिसे पोलिस हवालदार 731 अडसूळ पोलीस कॉन्स्टेबल 592 मेंगावडे पोलीस कॉन्स्टेबल 215 काशीद पोलीस कॉन्स्टेबल 1000 ढोले
असे कारवाई मध्ये सहभागी झाले होते एकूण 22 वाहनधारकावर कारवाई करण्यात आली यामध्ये ट्रिपल सीट, विना वाहन परवाना व अल्पवयीन मुले यांनी वाहन चालवणे यांचा समावेश आहे

Post a Comment
0 Comments