Type Here to Get Search Results !

हिंगणगाव गटामध्ये उद्या पासून शिवसेना शाखा उद्घाटनाचा दिमाखात प्रारंभ.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

हिंगणगाव गटामध्ये उद्या पासून शिवसेना शाखा उद्घाटनाचा दिमाखात प्रारंभ. 



सोमवार दि. ११/०५/२०२६ रोजी सकाळी ८:३० वा. हिंगणगाव येथे  व  ९.३० वाजता घाडगेमळा व  सायंकाळी ५ वाजता कापशी येथे व सायंकाळी ६ वा. टाकूबाईचीवाडी तसेच सायंकाळी ७ वाजता सासवड. येथे कार्यसम्राट धैर्यशील उर्फ दत्ताबापु अनपट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखा उद्घाटनाचा दिमाखात प्रारंभ होणार आहे.

फलटण- कोरेगाव मतदारसंघात गाव तेथे शिवसेना शाखा या उपक्रमास उद्या पासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होत आहे.यामुळे फलटण -कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेला मोठी ताकद व उभारी मिळेल असे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापु अनपट यांनी सांगितले 

 त्यासाठी मा. आ. श्री दीपकराव चव्हाण साहेब,मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर मा . विराज खराडे समन्वयक सातारा जिल्हा शिवसेना.मा.नानासो इवरे  तालुका प्रमुख शिवसेना मा.दत्ताबापु अनपट मा.सदस्य जि.प सातारा मा.अमोल सस्ते उपसभापती प.स.फलटण मा.संतोष कारंडे सदस्य प.स.व शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  शिवसेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे तरी गटातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी तसेच फलटण तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या (राजे गटाच्या) कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन धैर्यशील उर्फ दत्ताबापु अनपट यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments