सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फायरिंग करणाऱ्या दोन आरोपींच्या फलटण ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे डि.बी. पथकाकडुन ताब्यात घेण्यात यश.
खंडाळा पोलीस ठाणे हददीत दि. ०७/०७/२०२६ रोजी ११:४५ वा. चे सुमारास महाराष्ट्र बेकरी समोर
खंडाळा येथे तमाशाचे ठिकाणी तक्रारदार व त्याचा भाऊ यांना आसुतोष ऊर्फ बटया संतोष जाधव
रा. साखरवाडी सात सर्कल ता. फलटण जि.सातारा व त्याचे सोबत असणा-या दोन अल्पवयीन संशयीत यांनी
यांच्यात धक्का लागल्याचे कारणावरुन वाद झाला होता. सदर वादामध्ये आसुतोष ऊर्फ बटया संतोष जाधव
रा. साखरवाडी सात सर्कल ता. फलटण जि.सातारा व त्याचे सोबत असणा-या दोन अल्पवयीन संशयीत
यांनी "तक्रारदार यास मारहाण केली .त्यावेळी त्या तिघातील एकाने पिस्टल मधुन चार राउंड फायर केले.
त्यातील तक्रारदार यास दोन गोळया व सोबत असणा-या इसमास एक गोळी व एक गोळी मिस फायर
झाली होती .त्यातील एकाला जागेवरच पकडण्यात आले होते. त्यानुसार खंडाळा पोलीस ठाणे
गु.र.नं.७८/२०२६ बि.एन.एस.१०९,३५२,३ (५) शस्त्र अधीनियम ३,२५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
तसेच सदर गुन्हा करण्याचे पुर्वी यातील तिनही संशयीतांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे हददीत
साखरवाडी ता.फलटण येथे एकास पैसे परत देत नसल्याचे कारणाने पिस्टलचा धाक धाकवुन मारहाण
केली होती .त्या प्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२६ भा. न्याय संहीता कलम
१४०(१), व आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु यातील दोन फरार
अल्पवयीन संशयीत मिळुन येत नव्हते.तरी सदर संशयीत यांच्या शोधासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे.
मा.पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सुबनवळ यांचे एक
पथक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप-निरीक्षक दिपक पवार यांचे एक पथक तयार करुन शोध
घेत होते .वरील फरार दोन अल्पवयीन संशयीत हे एका ठिकाणी लपुन बसल्याची गोपणीय माहीती
मिळाल्यावर त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच सदर अल्पवयीन संशयीत
यांना पुढील तपासासाठी खंडाळा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. निखील पिंगळे सोो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस
अधीक्षक, मा. विशाल खांबे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली
राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक, स.पो.नि. सुबनवळ, डी.बी. पथकाचे पोलीस उप-निरीक्षक दिपक
पवार, पो.उप-निरीक्षक शिवानी नागवडे, नितिन चतुरे, महादेव पिसे, आमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणमंत
दडस,सुरज काकडे, श्रीकांत खरात,आमोल देशमुख यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Post a Comment
0 Comments