Type Here to Get Search Results !

मुरूम गावामध्ये बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यांवर फलटण ग्रामीण पोलीसांचा छापा.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

मुरूम गावामध्ये बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यांवर फलटण ग्रामीण पोलीसांचा छापा.


फलटण ग्रामीण पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी.

मौजे मुरूम ता. फलटण जि.सातारा येथील पोपट मारुती सोनवणे वय 65 वर्ष हा बेकायदेशीर देशी दारू विक्री करत असल्याचे समजताच फलटण ग्रामीण पोलिसांनी सदरच्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता सदरचा इसम हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस उघड्यावर देशी दारूची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले असता सदर त्या इसमाकडील देशी दारू सखु संत्रा दारूच्या 90 ml च्या 84 प्लॅस्टिकच्या बाटल्या रक्कम रुपये 3360 रुपयांच्या जप्त करण्यात आलेले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम,  उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, पोलीस हवालदार पिसे, पोलिस हवालदार अडसूळ ,पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांनी सहभाग घेतला होता

Post a Comment

0 Comments