सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
धुळ्यात सलग दुसरे दुहेरी हत्याकांड भोंदूगिरीने घेतला दोघांचा बळी.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसान पूर्वी दुहेरी हत्याकांड आणि धुळे जिल्हा हादरला होता या लगेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आणखी एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली साक्री तालुक्यातील वर्धाने उभरांडी शिवारात दोघांचा मृत्यूदेह आढळून आल्याने या एकच खळबळ उडाली सदर हत्याकांड भोंदूगिरीच्या नादी लागल्याने बोलले जात आहे या प्रकरणी एक भोंदुला ताब्यात घेतल्याचे समजले मिळालेल्या माहितीनुसार.. दिनांक16/2/2026सकाळी भडगाव व वर्धाने टेंबे फाट्याजवळ एका विवाहितेचा मृत्यूदेह आढळून आला विवाहितेच्या अंगावर अॅक्सेस १२५ एम एच १८सी एफ ८१५१या क्रमांकाची दुचाकी टाकण्यात आली होती प्रथमदर्शनी महिलेच्या तोडांला रूमाल बांधल्यामुळे हा अपघात असल्यास प्रथमदर्शनी पोलीसांना वाटले घटनास्थळी पोलीसांनी लगेच विवाहितेची ओळख पटवली मृत महिलेचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते वय २५ सदर महिला कासार्याची रहिवासी असल्याचे समजले सदर महिला बचत गटामार्फत बजाज फायनान्स कलेक्शनचे काम करायची घटने अगोदर त्या महिलेचे रात्री आपल्या पतीशी संभाषण झाले होते सदर घटनेने काकुस्ते परिवार हादरला व घटनास्थळी विवाहितेचा मोबाईल व पर्स आढळून आल्याने सदर प्रकार लुटीच्या नसल्याने प्रथम पोलीसांनी सांगितलें सदर घटनेचा पोलिसांनी काही मिनिटात शोध लावल्याने या घटनेत एक संशयित योगेश भैय्या बापु खैरनार जैताणे यास ताब्यात घेतले पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवत संशियताने गुन्हाची कबुली दिली यातून एक धक्कादायक बातमी समोर आली गुन्हेगाराच्या म्हणण्यानुसार एक व्यक्ती सदर महिलेचा खुन करीत असल्याचे माझ्या लक्षात आले मी त्या महिलेस वाचविण्यास गेल्याने त्या व्यक्तीचा माझ्याकडुन खुन झाला असे सांगण्यात आले सदर घटनेचे निजामपूर पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन पोलिस अधिकारी मयूर भामरे व त्यांच्या पथकाने लगेच सदर घटनेच्या गांभीर्याने दखल घेतली या घटनेने संशयिताच्या कबुलीनुसार मृत तरुणाचा मृत्यूदेह उमरांडी जैताणे गोशाळा मठाजवळील टेकडीवर एका निर्जन ठिकाणी पुरल्याचे सांगण्यात आले त्या ठिकाणाहून पोलिसांनी मृतदेह हस्तगत केला व मृतदेहाची ओळख पटली त्या मृत तरुणाचे नाव अक्षय सोनवणे असून तो भांडणे गावाचा रहिवासी असल्याचे समजते सदर भोंदुने दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे पोलिसांचा संशय वाढला व विवाहितेच्या तोंडाला बांधलेला रुमाल व पर्स मोटार सायकल यामुळे पोलिसांना शोध करणे सोपे झाले सदर घटनेचे गांभीर्य ओळखून एसीपी अजय देवरे या ठिकाणी स्वतः हा लक्ष देऊन होते सदर घटनेचा तपास वरिष्ठ अधिकारी ,फोरेन्सिक, एल सी बी ,डॉग स्कॉड आणि निजामपूर पोलिसांमुळे उघडीस आला.


Post a Comment
0 Comments