Type Here to Get Search Results !

पैशाच्या वादातून गोळीबार करणारे दोघे 24 तासात गजाआड; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

पैशाच्या वादातून गोळीबार करणारे दोघे 24 तासात गजाआड; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.




सातारा, दि. 19 - पैशाच्या व्यवहारातून बोलावून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून दोन राऊंड फायर करुन एकाला गंभीर जखमी करुन अहिल्यानगर येथे पळून गेलेल्या पोलीस अभिलेखावरील दोन आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे.


पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या कामगिरीबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.

नेमके काय घडले?

ही घटना दि. 17 जुलै 2026 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास मौजे पेरले गावच्या हद्दीतील इंदोली ब्रीज जवळील पाणंद रस्त्यावर घडली.


फिर्यादी संतोष शंकर घोलप (वय 37, व्यवसाय - टिप्पर वाहतूक सप्लायर, मूळ रा. कालगाव, ता. कराड) यांना पोलीस अभिलेखावरील आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड) याने फोन करून "पैशाचा व्यवहार मिटवू" असे सांगून बोलावले होते.


तेथे गेल्यानंतर आरोपीचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) याने फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर आरोपी सोमनाथ चव्हाण याने त्याच्या फॉर्च्युनर कारमधून पिस्तूल काढून फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या हेतूने दोन राऊंड फायर केले. फिर्यादी यांनी गोळ्या चुकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या व डाव्या पायाला गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले.


याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून उंब्रज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 297/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 49, 351(3), 352, 3(5), शस्त्र अधिनियम कलम 3(1), 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी लावला छडा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले.


दि. 18 जुलै 2026 रोजी पोलीस निरीक्षक घोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी गुन्हा करून अहिल्यानगर येथे पळून गेले आहेत.


माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाला तात्काळ अहिल्यानगर येथे रवाना करण्यात आले. पथकाने तेथे तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांकडे चौकशी करून शोध घेतला असता, दोन्ही आरोपी साई सूर्या हॉटेल, कायनेटीक चौक, अहिल्यानगर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली.

पथकाने हॉटेलवर छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, रमेश ठाणेकर, तसेच अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजीत भोसले, अमित झेंडे, स्वप्निल शिंदे, किरण जगताप, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, महेश निर्मळ, इरफान मुलाणी, विजय निकम आणि उंब्रज पोलीस ठाण्याचे संजय धुमाळ, श्रीधर माने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments