Type Here to Get Search Results !

श्री ग. वि .भोसले सर प्रतिष्ठान , साखरवाडी यांच्याकडून सर्व वारकरी माऊलींसाठी अल्पोपहाराचे वाटप.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर)

श्री ग. वि .भोसले सर प्रतिष्ठान , साखरवाडी यांच्याकडून सर्व वारकरी माऊलींसाठी अल्पोपहाराचे वाटप.




संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सर्व वारकरी माऊलींसाठी श्री ग. वि .भोसले सर प्रतिष्ठान , साखरवाडी
 यांच्याकडून अल्पोपहार ! आषाढी पायीवारी साठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सर्व वारकरी माऊलींसाठी साखरवाडी येथील श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठानने याही वर्षी अल्पोपहार आणि पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करून माऊलींचे आशिर्वाद घेतले. त्याचबरोबर प्रत्येक दिंडीतील विणेकरी माऊलीना श्रीफळ आणि साखर देऊन सन्मानित करण्यात आले.साखरवाडी नजीक बडे खान येथे शुक्रवार दिनांक १७/०७/२०२६ रोजी पहाटे पाच वाजलेपासून हा उपक्रम राबविण्यात आला. याविषयी माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गणपतराव भोसले , उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव भोसले आणि सचिव श्री हरिदास दिगंबर सावंत सर यांनी संयुक्तपणे सांगितले की हे प्रतिष्ठान गेली तीन वर्षे हा अन्नदान उपक्रम राबवत असून दरवर्षी अंदाजे पाच ते सात हजार वारकरी माऊली या उपक्रमाचा लाभ घेत आले आहेत. विश्वातील या एकमेव अद्वितीय सोहळ्यात आम्हाला अल्पशी सेवा करण्याची संधी मिळते याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो असेही आवर्जून सांगितले.उत्तरोत्तर यामध्ये वाढ करण्याची आणि हा उपक्रम सातत्याने सुरू राहिला पाहिजे यासाठी परमात्मा पांडुरंगाने आम्हाला प्रेरणा द्यावी अशी विनम्र भावना या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात श्री भोसले परिवारातील सर्व सदस्य तसेच साखरवाडी परिसरातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून सहकार्य केले. अनेक महत्त्वाच्या दिंडी प्रमुखांनी यावेळी आवर्जून भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सर्वांना प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.वारीतील अनेक वारकरी माऊलींनी यावेळी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments