सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण /वैभव जगताप
फलटण राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने १२ वर्षांची परंपरा कायम; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मनोभावे सेवा.
फलटण - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना गेली १२ वर्षे अखंडपणे सुरू असलेला 'वैष्णवांची सेवा' हा उपक्रम यंदाही फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उत्साहात आणि सेवाभावाने राबविण्यात आला.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा मेळा फलटण नगरीत दाखल होत असतो. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी काँग्रेसच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. याही वर्षी वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, उन्हापासून बचावासाठी नि-कॅप, दुखण्यावरील मलम, आवश्यक औषधे वाटप करण्यात आले. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळाला.
हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून वारकरी संप्रदायाची सेवा हीच आमची खरी पांडुरंग सेवा आहे, अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांची उपस्थिती
या सेवाभावी उपक्रम प्रसंगी फलटण तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार, राजेंद्र खलाटे, युवक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस मनिषा साळुंखे, युवक शहर अध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष अल्ताफ शेख, बाळमुकुंद भट्टड, ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे, विजय जगताप, अभिलाष शिंदे, मंजेखान मेटकरी, सुनील निकोडे, अजय ढेंबरे यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१२ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमाचे वारकऱ्यांनी आणि फलटणकरांनी कौतुक केले आहे.

Post a Comment
0 Comments