सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात थांबवला ताफा, महाबळेश्वरमध्ये शिवसैनिकांशी साधला आपुलकीचा संवाद.
महाबळेश्वर, दि. २४ - राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मूळ गावी 'दरे' येथे मुक्कामी होते. आज मुंबईकडे परतत असताना महाबळेश्वरमध्ये त्यांनी भर पावसात आपला ताफा थांबवून शिवसैनिकांशी आपुलकीने संवाद साधला.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे हे महाबळेश्वर मार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे जमले होते. यामध्ये महिला शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
धुवाधार मुसळधार पाऊस सुरू असतानाही कार्यकर्ते ताटकळत उभे असल्याचे पाहून शिंदे यांनी तात्काळ ताफा थांबवला. गाडीतून उतरून त्यांनी सर्व शिवसैनिकांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी शहरप्रमुख विजय नायडू यांनी त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
मेहंदीतील पोर्ट्रेटने वेधले लक्ष -
या भेटीचा विशेष आकर्षण ठरले ते स्थानिक मेहंदी आर्टिस्ट आकांक्षा अनिल पारठे हिने मेहंदीच्या माध्यमातून रेखाटलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोर्ट्रेट. मेघा चोरगे यांनी हे पोर्ट्रेट शिंदे यांना दाखवले. हे अप्रतिम कलाकृती पाहून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकार आकांक्षा पारठे हिच्या कलेचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, गोविंद कदम, मेघा चोरगे, पूजा उतेकर, सोनाली बांदल, सुनिता फळणे, शितल वाईकर, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, मंगल फळणे, किरण मोरे, सुभाष फळणे, सचिन ओतारी, मंगेश चोरगे, राहुल साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे महाबळेश्वरमधील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments