सह्याद्री निर्भिड न्यूज
संपादक -वैभव जगताप
फलटण - निरा उजव्या कालव्यात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला.
फलटण, येथील निरा उजव्या कालव्यात एका अनोळखी महिलेचे प्रेत वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४/०७/२०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्यान यशवंतराव चव्हाण कॉलेज, फलटण ता. फलटण येथील शेजारी असलेल्या निरा उजव्या कॅनॉलमध्ये वाहत आलेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी तात्काळ याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून फलटण शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आला आहे. या मयताचा पुढील तपास पो.हवा. साबळे हे करीत आहेत.
मयत महिलेचे वर्णन :
• वय: अंदाजे ७० ते ७५ वर्षे • रंग: गोरा • नाक: सरळ • उंची: ४ फूट ८ इंच • अंगातील कपडे: नेसणेस गुलाबी रंगाची व मोरपंखी रंगाची अशी दोन रंगाची साडी, निळ्या रंगाचा ब्लाऊज, त्याला पुढे पांढरे बटन • इतर खुणा: गळ्यात काळा दोरा, उजव्या हातात पंचरंगी धागा बांधलेला, उजव्या हाताच्या बोटात पांढऱ्या धातूची अंगठी, व दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या.
सदर वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास किंवा बेपत्ता असल्यास तिच्या नातेवाईकांनी तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्कासाठी :
१) फोन नंबर - ०२१६६२२२३३३
२) मोबाईल नंबर - ९८८१४९८९९०
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून वृद्ध महिलेची ओळख पटण्यास मदत होईल.

Post a Comment
0 Comments