Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील हृदयद्रावक घटना : दुध काढण्याच्या मशीनचा शॉक लागून २८ वर्षीय महिलेचा मृत्यू.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण तालुक्यातील हृदयद्रावक घटना : दुध काढण्याच्या मशीनचा शॉक लागून २८ वर्षीय महिलेचा मृत्यू.



गुणवरे, ता. फलटण, दि. २५ -फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे येथे विजेचा धक्का लागून एका २८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र. ४४/२०२५, BNSS कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण यांनी दिलेल्या माहीती नुसार हकीगत अशी की,

दि. २४/०७/२०२६ रोजी सायंकाळी ०६.४५ वा. चे सुमारास प्रियंका तानाजी कर्णे, वय २८ वर्षे, रा. गुणवरे, ता. फलटण या आपले पती तानाजी तात्याबा कर्णे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या.


दूध काढून झाल्यानंतर मशीनला जोडलेले कॅनचे झाकण काढून गोठ्यातील बोर्डाच्या पाटीला अडकवण्यासाठी जात असताना प्रियंका यांना अचानक जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने जवळच असलेले त्यांचे पती फिर्यादी तानाजी तात्याबा कर्णे, वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती यांनी धाव घेत त्यांना ओढून बाजूला केले. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या.


नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रात्री ०८.३० वा. चे सुमारास त्यांना मयत घोषित केले.


या घटनेने गुणवरे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


पोलिसात नोंद

याबाबत फिर्यादी तानाजी तात्याबा कर्णे यांनी दिलेल्या खबरीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू नं. ४४/२०२५, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा तपास परिस्थितीजन्य - तपासावर आहे.


पोलीस प्रशास जेनाचे आवाहन

पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी बांधवांनी जनावरांच्या गोठ्यातील, शेतातील विद्युत उपकरणे, वायरिंग, अर्थिंग याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. ओलसर जागेत उघड्या वायर, खराब बोर्ड वापरू नयेत, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments