Type Here to Get Search Results !

पणदरे हादरलं! गर्भवती महिलेचा बलात्कार करून खून करणारा नराधम 2 तासात जेरबंद.माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

पणदरे हादरलं! गर्भवती महिलेचा बलात्कार करून खून करणारा नराधम 2 तासात जेरबंद.माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी..


बारामती - पणदरे MIDC परिसरात एका 26 वर्षीय गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने खुनानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता.

काय घडलं?

दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून नातेवाईक घरी पोहोचले असता महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे कार्यक्षम प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कुलदीप संकपाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

अवघ्या 2 तासात आरोपीला बेड्या

घटनास्थळाची पाहणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी संशयित गणेश रामचंद्र माने (वय 26, रा. पणदरे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हातोडा, त्याचे कपडे आणि लुटलेले दागिने हस्तगत केले आहेत. PM रिपोर्टमध्ये महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यावर गंभीर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

आरोपीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादर आणि  उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस टीमने केली.

Post a Comment

0 Comments