सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
देखाव्यातून स्वच्छ सुंदर आणि पर्यावरण पूरक शहरीकरणाचा संदेश युवा उद्योजक अभियंता विजय मोराळे यांचा कौतुकास्पद उपक्रम.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे' या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे निसर्गाला आपले सर्वस्व मानून पुण्यातील तरुण उद्योजक आणि अभियंता विजय मोराळे यांनी गणेशोत्सवामध्ये आपल्या 'इंजिनिअर कन्स्ट्रक्शन वाला' कंपनीच्या कार्यालयामध्ये पर्यावरण पूरक गृहसंकुलाचा देखावा सादर करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम क्षेत्रामध्ये नावाजलेल्या इंजिनिअर कन्स्ट्रक्शनवाला ग्रुपने आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त गृहसंकुले उभारली असून १००० पेक्षा जास्त कुटुंबांना दर्जेदार राहणीमान मिळवून दिले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी केवळ आकर्षक सजावट न करता पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा अभिनव देखावा उभारण्यात आला आहे. सुंदर, स्वच्छ आणि पर्यावरण पूरक शहर कसे असावे या संकल्पनेवर आधारित गणपती बाप्पांची सजावट साकारण्यात आली आहे.
या संकल्पनेत स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, रेसिडेन्शियल बिल्डिंग, बंगले तसेच आधुनिक शहरासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांचे हिरव्या पर्यावरणाशी नाते दर्शविण्यात आले आहे.
मुख्य संदेश : ज्या प्रमाणे आपण बाप्पांची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे. विकास आवश्यक आहे; मात्र विकासासोबत झाडे, हिरवळ आणि स्वच्छ पर्यावरण जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. टाउनशिपच्या माध्यमातून योग्य नियोजन केले तर आधुनिक शहर उभारताना निसर्गालाही सोबत घेऊन पुढे जाता येते.
"विकास करा, पण निसर्गाला सोबत घेऊन - हाच या सजावटीचा मुख्य संदेश आहे."
ही सजावट केवळ सुंदर दिसण्यासाठी नसून पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा देखावा पाहून पर्यावरणपूरक संदेश घ्यावा असे आवाहन विजय मोराळे यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments