सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी हरिदास सावंत (सर)
साखरवाडी येथे श्री ग. वि. भोसले सर प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम; मोरया गणेशोत्सव मंडळास शेड व स्टेज अर्पण.
साखरवाडी, ता. फलटण: साखरवाडी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान (श्री ग. वि. भोसले सर प्रतिष्ठान), साखरवाडी यांच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे ४०,००० रुपये खर्च करून श्री मोरया गणेशोत्सव मंडळ, ट्रँगल चाळ, साखरवाडी या मंडळास कायमस्वरूपी शेड व स्टेज बांधून अर्पण करण्यात आले. यामुळे मंडळाच्या गणेशोत्सवासह इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
या लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्री गणरायाच्या दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या आरतीचा मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सौ. सचिन गणपतराव भोसले आणि सचिव श्री. हरिदास सावंत सर यांना देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.
त्यानंतर मंडळाच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सचिन भोसले आणि सचिव श्री. हरिदास सावंत सर यांचा मंडळाचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे सचिव श्री. हरिदास सावंत सर यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. तर अध्यक्ष श्री. सचिन भोसले यांनी श्री मोरया गणेशोत्सव मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व भविष्यात मंडळाला लागेल ते सर्व सहकार्य प्रतिष्ठानच्या वतीने केले जाईल, असे आश्वासन दिले व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास श्री मोरया गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ट्रँगल चाळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments