मुस्लिम समाज साखरवाडी वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
साखरवाडी पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांनी रक्तदान करून केला नवीन आदर्श
प्रतिनिधी /दादा जाधव
साखरवाडी ता. फलटण येथे आज दि. २३.०९ .२०२३ रोजी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाज साखरवाडी चे अध्यक्ष हाजी गुल मोहम्मद मदार भाई शेख यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
साखरवाडी बाजार मध्ये दादासाहेब नलवडे व्यासपीठावर मुस्लिम समाज साखरवाडी व अक्षय रक्त केंद्र हडपसर भाग्यश्री जाधव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला
साखरवाडी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व सहायक फौजदार मोहन हांगे, युवा उद्योजक संजय भोसले यांनी स्वतः रक्तदान करून शिबीरास सुरुवात केली साखरवाडीतील पोलीस स्टेशनचे पोलीस बांधवांकडून सामाजिक एकात्मतेचे दर्शन दिसून आले
यावेळी साखरवाडीतील मुस्लिम समाज साखरवाडी अध्यक्ष हाजी गुल मोहम्मद मदार भाई शेख, शौकत भाई कच्छी,अरिफभाई मणेर, अन्वर महात, रिजवान मुजावर, फिरोज शेख, मुन्नाभाई खान, आसिफ शेख तनवीर मनेर व पत्रकार बांधव उपस्थित होते




Post a Comment
0 Comments