Type Here to Get Search Results !

तब्बल 2 लाखाच्या 15 मोबाईलचा कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथका कडुन शोध

 तब्बल 2 लाखाच्या 15 मोबाईलचा कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथका कडुन शोध

फलटण/वैभव जगताप 


तब्बल २ लाखाच्या १५ मोबाईलचा महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश, राज्यातुन कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथका कडुन शोध

मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. आर.एल.डांगे व डीबी पथकाने तब्बल २ लाखाच्या १५ मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रा, उत्तर प्रदेश, राज्यातुन घेतला शोध

कराड शहर हे सातारा जिल्हयातील एक नामांकीत शहर व मुख्य बाजार पेठ आहे. त्यामुळे आजुबाजुचे गावातुन दररोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी कराडमध्ये येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व ईतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस उप निरीक्षक श्री आर. एल. डांगे व पथकाने अश्या गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातुन माहिती प्राप्त केली. सदर माहितीचे तांत्रिक विषलेशन करुन महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश हया राज्यातुन मोबाईलचा शोध घेवुन मोबाईल धारकास त्यांचे माबाईल परत केले आहेत. गरीबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढुन घेतलेले मोबाईल हरवले असताना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन कराड शहर डी बी पथका विषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सदर ची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी.कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई,संजय देवकुळे पोलीस हवालदार . शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ, रईस सय्यद यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments