राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक / टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमत आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या माल वाहतूकीच्या वाहनातून डिझेल चोरी करणारे लोकांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांचे अधिपत्या खाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनातून डिझेल चोरी करणारे इसमांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
दि.०९/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पाचवड गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ चे सर्व्हिसरोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट क्र. एम. एच.४३ ए.एन. ७७९१ मधून काही इसम महामार्गावर जाणाऱ्यावाहनांना थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे काय ? असे विचारत आहे. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांचे विशेष पथकास प्राप्त बातमीचे ठिकाणी जावून नमुद स्विफ्ट कार व इसमांनाताब्यात घेवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने प्राप्तबातमीचे ठिकाणी जावून नमुद वाहन व ४ इसमांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या डिझेलच्याकॅनबाबत विचारपूस केली असता त्यांनी कॅनमधील डिझेल त्यांनी भुईंज गावच्या हद्दीतील प्रतापगड ढाब्याचे समोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून चोरी करुन विक्री करण्याकरीता आणले असल्याचे सांगीतले. तसेच त्यांनाआणखी विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी २ महिन्यापुर्वी शिरवळ येथून उभ्या असलेल्या डंपरमधूनदेखील डिझेल चोरी केले असल्याचे सांगीतल्याने भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं.४६७ / २०२३ भादविक ३७९ वशिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं.२२९/ २०२३ भादविक ३७९ असे दोन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.तसेच नमुद आरोपींच्याकडून डिझेल चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन, चोरी केले डिझेल, मोबाईल हॅन्डसेटअसा मिळून एकूण ४, ५१,५६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचेमार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीसउपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ,संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळूंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments