घरफोडीचा गुन्हा केला ०४ दिवसांत उघड सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त
फलटण/वैभव जगताप
पाचगणी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी
मौजे कासवंड ता. महाबळेश्वर येथे दिनांक ०३/१०/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वा ते ०६.०० वा.दरम्यान कासवंड येथे शेतामध्ये राहत असलेल्या वयोवृध्द दांपत्य श्री आनंदा दगडु पवार यांचे राहते घराचे कुलुपबंद दरवाजा तेथे ठेवलेल्या चावीने उघडुन ते शेतामध्ये काम करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घरातील पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची चैन व तीन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र व चांदीच्या पटटया, तसेच कानातील फूले असे चोरी करून नेलेले होते त्याबाबत आंनदा पवार यांनी दिले तक्रारीवरून पाचगणी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.दिवसा घर फोडी झालेने लोकांचे मध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेने मा. पोलिस अधिक्षक श्री. समीर शेख साहेब यांनी यातील फिर्यादी हे वयोवध्द असल्याने सदर गुन्हयाचा तपास कसोशीने करण्याबाबत पाचगणी पोलिसांना मार्गदर्शन व आदेशीत केलेले होते. त्यामुळे सदर गुन्हयाचे तपासकामी प्रभारी अधिकारी राजेश माने यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती सोमदे वरूडे, त्याचप्रमाणे पोलिस अंमलदार रविंद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे यांचे तपास पथक तयार करून सदर गुन्हयाचा तपास करीत असताना श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात येवून तपास करण्यात आलेला होता. परंतु तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सीसीटिव्ही व इतर तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने सदरची चोरी ही कोणीतरी माहितीचे माणसाने लक्ष ठेवून केलेली असावी असे एकमत झालेने पोलिस पथकाने तपासाची दिशा फिर्यादी यांचे कुटुंबातील नातेवाईक यांचेकडे वळवून त्यांचेकडे सखोल तपास करीत असताना ते कोठे राहत आहेत याची खात्री करून त्या परिसरात माहिती घेत असताना गोखलेनगर हडपसर पूणे येथे घरफोडी करुन चोरीस गेलेले दागिने विक्री झाले असलेबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळालेने तपास करीत असताना घर फोडीतील सोन्याचे दागिने हे फिर्यादी यांची विधीसंघर्षग्रस्त नात हिने चैनीचे वस्तु खरेदी करण्याकरीता सदरचे सोने हे पूणे येथून कासवंड येथे येवून चोरी करून चोरीचे दागिने तिचा विधीसंघर्षग्रस्त मित्र व त्याची आई श्रीमती सुनंदा तुकाराम बनसोडे वय ३८ वर्षे रा. गोखलेनगर, जानवाडी, सोमेश्वर मंदिर पूणे हिचे ओळखीने व मदतीने गोखलेनगर येथील एका सोनारास विकून त्यातुन आलेल्या पैशातून महागडे कंपनीचा मोबाईल व एक स्कुटी मोटारसायकल बुक केल्याचे तपासात निष्पन्न झालेने विधीसंघर्षग्रस्त बालके तसेच आरोपी महिला नामे सुनंदा बनसोडे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून घर फोडी करून चोरून नेलेले सहा तोळे वजनाचे सोन्याचे चैन व मणीमंगळसूत्र व कर्णफुले तसेच चांदीच्या पटया असा चोरीस गेलेला संपूर्ण मुददेमाल हस्तगत केला आहे. पाचगणी पोलिसांनी सदरचा गुन्हा हा कसलीही माहिती नसताना कौशल्यपूर्ण तपास करून सुतावरून स्वर्ग गाठून उघडकीस आणलेला आहे. याबाबत वयोवृध्द दांपत्यांनी पाचगणी पोलिसांचे त्यांनी शेतामध्ये काबाडकष्ट करून एक-एक रूपया जमवून केलेल्या सोन्यांचे दागिने परत मिळवून दिल्याबददल आभार व्यक्त केले आहेत.
सदरची कारवाई ही मा. समीर शेख, पोलिस अधिक्षक सो सातारा मा आंचल दलाल सो, अप्पर पोलिस अधिक्षक सोो, सातारा, मा. बाळासाहेब भालचिम सो, उपविभागीय पोलिस अधिकारी सोो, वाई यांचया मार्गदर्शनाखाली श्री राजेश माने, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे वरूडे, पोलिस अंमलदार रविंद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे पाचगणी पोलिस ठाणे यांनी केलेली आहे. तपास पथकाचे मा.समीर शेख पोलिस अधिक्षक सोो सातारा, मा. आंचल दलाल, अप्पर पोलिस अधिक्षक सोो, सातारा यांनी त्यांचे कामगिरीबाबत अभिनंदन केलेले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप
मोबाईल ८००७८५२१२१/७३८७९७२१२१


Post a Comment
0 Comments