फलटण- बारामती राष्ट्रीय महामार्गाची सांगवी गावामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली आढावा बैठक
प्रतिनिधी तानाजी सोडमिसे
फलटण- बारामती रस्ता संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग यांना जोडणाऱ्या या महत्वाच्या रस्त्याचे चौपदरी करण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मंजूर करण्यात आलेले आहे उंडवडी कडे पठार_ बारामती_ फलटण या ३६ कि.मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० असून महामार्गाचे चौपदरी करण केंद्र शासनांतर्गत रस्ते वाहतूक राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि. २१मार्च २०२३मंजुरी दिली
नवीन२०१३ सालच्या भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात आला त्या कायद्या अंतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचे त्या भूप संपादन झालेल्या संयुक्त मोजणी करून मुख्यत्वे हद्द कायम निश्चित करण्यात आले. त्या संदर्भात प्रांताधिकारी म्हटले की ज्या वर्षी शासन भूसंपादन करेल त्या वर्षाच्या मागील तीन वर्षाच्या त्या भागातील प्रॉपर्टी चे खरेदी व्यवहाराची सरासरी लक्षात घेऊन बाजार मूल्य काढले जाते ते संपादित शेतकऱ्यास मंजूर नसल्यास संबंधित शेतकऱ्यांनी ४२ दिवसाच्या आत न्यायालयामध्ये याचीका दाखल करावी लागते तशा प्रकारचे सोमंथळी येथील ४० शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये वाढीव रकमेची मागणी केलेली त्यांना न्यायालयाकडून वाढीव रक्कम मिळेल. उर्वरित संपादित शेतकऱ्यांनी अवार्ड मधील रक्कम न्यायालयामध्ये जाण्याचे हक्क अबाधित राखून रक्कम स्विकारून रस्त्याचे काम गतिमान करण्यास सहकार्य करावे. तसेच सोमंथळी मधील सलग तीन झालेले प्राण घातक अपघाता सारखे प्रकार टाळता येतील असेही मत व्यक्त केले.
सांगवी माळवाडी सांगवी (बारामती) स्मशानभूमीची स्थळ पाहणी करून सांगवी गावातील ग्रामस्थांच्या गैरसोयीचा विचार करून पर्यायी जागा उपलब्ध केल्यास शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. प्रांताधिकारी सचिन ढोले म्हटले.
सांगवी ता फलटण ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करताना यापूर्वी तुमच्या प्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले असता सोमंथळी प्रमाणे मोबदला मिळाला असता यावेळी शासकीय अधिकारी सचिन ढोले पाटील, तलाठी दत्तात्रय धुमाळ, अशोक भिसे, अविनाश भोसले, आडके
व सांगवीचे सरपंच संतोष मोरे, कृ.उ.बा. समिती सदस्य चांगदेव खरात , तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार जगताप , सुरेश जगताप, किसन नाळे , सांगवी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१/७३८७९७२१२१


Post a Comment
0 Comments