Type Here to Get Search Results !

आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई

 आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई 

फलटण /वैभव जगताप 

वडुज पोलीस ठाणे गु.र.नं. १३८/२०१९ भादविसं.४२०,४०८, ४०९,४६५,४६७, ४६८,४७१,२०१,३४ व एमपीआयडी कायदा कलम ३ प्रमाणे दि. १५/०५/२०१९ रोजी दाखल गुन्हयांमध्ये गेले ४ वर्षापासून पाहिजे असलेले ५ आरोपी यांना अटक करून २८७.२२० ग्रॅम.मिली सोने त्यांची अंदाजे रक्कम १२,९३,०००/- रुपये किंमतीचे सोने जप्तकेलेबाबत.

मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यामधील दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या सूचना मा. मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने मा. मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांनी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासास असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करणेबाबत सूचना दिल्या होत्या.

चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडुज ता. खटाव जि. सातारा चे तत्कालीन संचालक, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखाप्रमुख, कॅशिअर यांनी संगनमताने अपुरे कागदपत्रे असताना गृहतारण कर्ज वाटप, बोगस ठेवतारण कर्ज वाटप, संस्थेच्या नावावर अनावश्यक बँक खाती निबंधकाचे परवानगी शिवाय उघडून त्यावर मोठे व्यवहार करण्यात आले आहे याबाबत लेखापरिक्षण करून १८,२८,९२,३३४/- रूपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चाचणी लेखापरिक्षण दरम्यान आणखी ३,०९,८३,३२८/-रूपयांचा अपहार उघडकीस आला व अंतीम वैधानिक लेखापरिक्षणामध्ये ६,०७,२४,१३४.७४/- रक्कमेचा अपहार उघडकीस आला आहे असा चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडुज ता. खटाव जि. सातारा व शाखेमध्ये एकुण २७,४६,०२,७९७/- रक्कमेचा अपहार करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांच्या तपासामध्ये २४आरोपींपैकी १० आरोपीविरूध्द दि. १३/४/२०२२ रोजी दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते उर्वरित आरोपी पाहिजे असलेने त्यांच्याविरूध्द मा. विशेष जिल्हा सत्र न्यायालय वडुज यांचेकडे सी.आर.पी.सी ७० प्रमाणे वॉरंट प्राप्त करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यानुसार मा. कोर्टाने दि. ०७/०९/२०२२ रोजी नॉनबेलेबल वॉरट जारी केले होते. सदर पाहिजे आरोपी १) निलेश गजानन येळगावकर (शाखाप्रमुख) रा. पंतनगर वडुज ता. खटाव २) रविंद्र आनंदराव गोडसे (वसुली अधिकारी) रा.शिवाजीनगर वडुज ३) अमित विलास काळे (शाखाप्रमुख) रा. हिंगणे ता. खटाव ४) भानुदास वसंत काळुखे (शाखाप्रमुख) रा. काळुखे वस्ती खातगुण ता. खटाव ५) संतोष मधुकर काळे (कॅशिअर)रा. हिंगणे ता. खटाव यांना दि.०५/१०/२०२३ रोजी १७.४५ वाजता अटक करण्यात आली आहे. रिमांडकामी त्यांना मा. विशेष जिल्हा सत्र न्यायालय वडुज यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली होती त्यादरम्यान वरील सर्व आरोपींची गुन्हयांच्या तपासाच्या अनुशंगाने घरझडती घेतलीअसता आरोपी नामे भानुदास वसंत काळुखे यांच्या घरझडती दरम्यान चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वड्डुज पतसंस्थेच्या लॉकरसच्या चाव्या मिळून आल्या त्याबाबत आरोपीस विचारणा केली असता त्यांने संबधित लॉकर मध्ये सोने तारण कर्जातील काही कर्जाचे सोने ठेवले असलेबाबत सांगितले त्याबाबत निवेदन पंचनामा करून२८७.२२० ग्रॅम मिली सोने अंदाजे १२,९३,०००/- रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आलेले आहे.सदर कारवाईमध्ये मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. आंचल दलाल, अपर पोलीसअधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली सुरेश गेंगजे, पोलीस निरीक्षक, सहा. पो. फौ. प्रमोद नलावडे, पो.हवा. मुलाणी, प्रशांत ताटे, सुरजगवळे, पो. ना. वैशाली गुरव पो. कॉ. शफिक शेख, संकेत माने, अजित पवार, वैभव बाजारे महिला पो. कॉ. अर्चना शिंदे चालक संतोष राऊत यांनी सहभाग घेतला असून सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments