साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन समारंभ संपन्न..!
फलटण/वैभव जगताप
मौजे, साखरवाडी ता. फलटण, जि. सातारा. साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यपिका सौ उर्मिला ताई जगदाळे यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी तसेच पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे,सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत, ग्रंथालय विभाग प्रमुख श्री विलास ननावरे यांनी वाचनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.प्रारंभी सहाय्यक शिक्षक श्री सुनील भोसले यांनी या निमित्ताने एका प्रतिज्ञेचे वाचन करून सर्व विद्यार्थ्यांकडून ती म्हणून घेतली
.यावेळी ग्रंथ प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.श्री भिमकांत कुंभार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments