Type Here to Get Search Results !

आपले किल्ले आपली जबाबदारी

 आपले किल्ले आपली जबाबदारी -सातारा पोलिस अधीक्षक- समीर शेख 

दिनांक १५/१०/२०२३

फलटण/वैभव जगताप 

सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित, ९ वी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम किल्ले सदाशिवगड


दिनांक ११/०६/२०२३ रोजी “आपले किल्ले आपली जबाबदारी" अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत किल्ले सदाशिवगड, ता. कराड या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये कराड उपविभागातील कराड शहर, कराड तालुका, उंब्रज, तळवीड या पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. सदर मोहिमेदरम्यान सदाशिवगडाच्या पायथ्याशी एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन किल्ले सदाशिवगड येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान पायथा परिसर, शंकर मंदिर, तलाव परिसर तसेच इतर परिसरात स्वच्छता करुन जैविक व अजैविक असा अंदाजे ५० किलो कचरा गोळा करण्यात आला. तसेच तलावाजवळ सर्वांना एत्रित करुन श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्री.अमोल ठाकूर उ.वि.पो.अ.कराड यांनी गड स्वच्छता व गड मोहिमेचे महत्त्व पटवून दिले.


सदर मोहिमेमध्ये श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग, श्री. पी. बी. सुर्यवंशी, पो. नि. कराड शहर पो. ठाणे, श्री. व्ही. टी. पाटील कराड तालुका पो. ठाणे, श्री.पी. डी. बधे उंब्रज पो. ठाणे, श्री. आर. आर. वरोटे तळबीड पो. ठाणे, श्री. सी.एम.मछले स.पो.नि. वाहतुक नियंत्रण शाखा कराड, श्री. व्ही. ए. शेलार, स.पो.नि. मसूर पो. ठाणे, वगैरे असे २२ पोलीस अधिकारी, १०८ पोलीस अंमलदार व ५०० नागरीक,सामाजिक कार्यकर्ते व विदयार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.

दिनांक १५/०१/२०२३ रोजी पासून सातारा पोलीस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत १ ) अजिंक्यतारा (दि. १५/०१/२०२३), २) वसंतगड ( दि. २२/०१/२०२३),३)जरंडेश्वर(दि.२९/०१/२०२३), ४) वैराटगड(दि.०५/०२/२०२३), ५) संतोषगड(दि.०५/०३/२०२३), ६) दातेगड(सुंदरगड) (दि. १६/०४/२०२३), ७) भूषणगड ( दि. ०४/०६/२०२३) ८)कल्याणगड (दि.११/०६/२०२३) ९)सदाशिवगड (दि. १५/१०/२०२३) या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असून मोहिमेत आज अखेर १३६ पोलीस अधिकारी, ७२१ पोलीस अंमलदार, २४६० नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे ९४९ किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे.सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्हयातील एक किल्ला निवडून सदरची मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments