Type Here to Get Search Results !

कराड पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांची अंमली पदार्थ धंदयावर धडक कारवाई


फलटण /वैभव जगताप 

म्होप्रे ता. कराड गावातून ०५ गांजाची झाडासहीत ११.८७० कि. ग्रॅ. वजनाचा १,२६,९२०/- रुपये किंमतीचा गांजा जप्त

मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी साताराजिल्हयामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत सुचना केले आहेत. त्यानुसार कराडचेउपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारयांना सुचना दिलेल्या आहेत.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांना बातमीदारा मार्फत दिनांक २० / १० / २०२३रोजी बातमी मिळाली की, म्होप्रे ता. कराड येथील सोमनाथ पांडुरंग जाधव रा. म्होप्रे ता. कराड याने म्होप्रे बेघर वसाहतीचे शेजारील त्याचे मालकीचे शेतात गांजा पिकाची लागवड केली आहे. अशी बातमी मिळालेने त्यांनी पो. नि.विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे असे बोलावून घेवून बातमीचा आशय सांगून छापा कारवाई करणेबाबत सुचना केल्या त्याप्रमाणे मौजे म्होप्रे ता. कराड गावचे हददीतील बेघर वसाहतीचे शेजारील सोमनाथ जाधव याचे मालकीचे शेतात छापा पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी छापा कारवाई करुन ११ ०४८ कि.ग्रॅ. वजनाची ५ गांजाची झाडे तसेचआरोपीचे घरातून ०.८२२ ग्रॅम वजनाचा असा एकुण ११.८७० कि. ग्रॅ. वजनाचा १,२६,९२० /- रुपये किंमतीचा मुददेमालमिळून आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शना खाली श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ.सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, उत्तम कोळी,गणेश वेदपाठक, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे, म.पो. कॉ. जयश्री डोईफोडे यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१


Post a Comment

0 Comments