Type Here to Get Search Results !

अभिजीत रणवरे यांच्या शेताला आयटी तज्ञांची भेट!

 अभिजीत रणवरे यांच्या शेताला आयटी तज्ञांची भेट!



फलटण/वैभव जगताप 



निंभोरे, तालुका फलटण येथील संगणक अभियंते श्री अभिजीत रणवरे यांच्या WorldatWork या कंपनीतील सहकाऱ्यांनी नुकतीच निंभोरे या गावी भेट देऊन ग्रामीण जीवनशैली तसेच शेतीचा अनुभव घेतला. यावेळी WorldatWork कंपनीचे प्रेसिडेंट मिहाय पोपाआका आणि व्हॉइस प्रेसिडेंट कोरी बर्नोस्की हे परदेशी पाहुणे, तसेच कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर शीतल राऊत आणि इतर सहकारी उपस्थित होते. 





श्री अभिजीत रणवरे यांच्या निवासस्थानी फेटे घालून सर्व पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी अभिजीत रणवरे यांच्या शेतामध्ये फेरफटका मारत विविध पिके, फळबागा आणि भाजीपाला याची सखोल माहिती घेतली. तसेच वेगवेगळ्या सिंचन पद्धती समजावून घेतल्या. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परदेशी पाहुण्यांनी बैलगाडी सफरीचा आनंद लुटला तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.



संगणक क्षेत्रातील सहकाऱ्यांनी मराठमोळी ग्रामीण जीवनशैली आणि प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतीचा अनुभव मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments