मेढा पोलीस ठाणेची अवैद्य धंद्यांवर कारवाई
फलटण/वैभव जगताप
गुटक्याची अवैद्य चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारे इसमावर मोठी कारवाई
करून बेकायदेशीर गुटक्याचा मुद्देमाल व वाहन असा एकूण ५,७६,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त )
श्री. समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचिम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांनी अवैद्य व्यवसायांवर छापे टाकून कारवाई करणेच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यानुसार दि.२४/१०/२०२३ रोजी कुडाळ ते पाचगणी रोडवरून एक इसम गुटखा व पान मसाला विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार आहे अशा आशयाची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष तासगांवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाली. त्यानुसार लागलीच पोलीस स्टेशन कडील स्टाफचे सहाय्याने मिळाले बातमीचे अनुशंगाने सापळा लावून थांबलो असता, मिळालेल्या माहीती नुसार एक इसम पाचवड बाजुकडून पाचगणी बाजुकडे एक पांढरे रंगाची ऑक्टावीआ स्कोडा नं.एम.एच.१४.सी.सी.६१६१ ही येताना दिसली असता त्याला सदरची कार थांबविणेबाबत इशारा केला असता ती न थांबविल्याने तिचा पाठलाग करून त्यास मौजे हुमगाव ता. जावली जि. सातारा गावचे हद्दीत न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज हुमगावचे समोर रोडवर पकडले. कारमधील इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने
आपले नाव आकाश प्रकाश मोरे, वय ३२ वर्षे रा. विराटनगर, अमृतवाडी, ता. वाई, जि. साताराअसे सांगीतले. त्यानंतर त्यास ताब्यात घेवून सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण ५६,०००/- रूपयांचा अवैद्य गुटखा आढळुन आल्याने सदरचा अवैद्य प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण ५,७६,०००/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेवुन जप्त करणेत आलेला असून सदर आरोपीविरूद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे फिर्यादीवरून मेढा पोलीस ठाणेस गुन्हदाखल करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई श्री. समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री बाळासाहेब भालचिम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष तासगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. डी. जी. शिंदे, पो.ना. शेख, पो.कॉ/ सनी काळे,निलेश देशमुख,पोलीस पाटील आखाडे श्री योगेश शिंदे यांनी केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments