Type Here to Get Search Results !

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साखरवाडी विडणी राजाळे मध्ये बीएसएफ व स्थानिक पोलिसांचे पथ संचलन.

सह्याद्री निर्भिड न्यूज

साखरवाडी/वैभव जगताप 

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साखरवाडी विडणी राजाळे मध्ये  बीएसएफ व स्थानिक पोलिसांचे पथ संचलन.


आगामी लोकसभेची आचारसंहिता सुरू झालेली आहे. या काळामध्ये कायदा सुव्यवस्था चोख राहण्यासाठी. व निवडणुका निरपेक्ष व निर्भय वातावरणात होण्यासाठी. केंद्रीय राखीव तुकड्यासोबत फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठ्या लोकसंख्या असलेल्या साखरवाडी विडणी राजळे या गावांमध्ये सशस्त्र पथसंचलन केले. सदर वेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक पाटील गोपाळ बदाणे तसेच केंद्रीय राखीव तुकडी बीएसएफचे पोलीस निरीक्षक थंडर बोल्टपीएसआय दत्ताराम केंद्रीय राखीव दलाचे 70 जवान व स्थानिक पोलीस स्टेशनचे 30 पोलीस कर्मचारी व 30 होमगार्ड हजर होते. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये कोणीही बेकायदेशीर कृत्य केल्यास व कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा संदेश या पथसंचलनातून देण्यात आला.

सदरचे पत्र संचलन माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक माचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments