Type Here to Get Search Results !

लोकप्रिय माजी सरपंच विक्रम (आप्पा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ...!

 सह्याद्री निर्भिड न्यूज

प्रतिनिधी/दादा जाधव 

लोकप्रिय माजी सरपंच विक्रम (आप्पा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ...!


माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडून लोकप्रिय सरपंच विक्रम(आप्पा)भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त   साखरवाडी ग्रामपंचायत ला विकासकामांची भेट.


 


साखरवाडीतून भरघोस मताने खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना निवडून देणार-विक्रम सिंह भोसले



महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार पक्षाच्या आदेशाप्रमाणे करणार- महानंदा दूध डेअरी चे उपाध्यक्ष डी के पवार .


 


  प्रतिनिधी/दादा जाधव

               या वाढदिवसाचे औचित्य साधून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विक्रम(आप्पा)भोसले यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या साखरवाडी ग्रामपंचायतला भरघोस विकासकामे देऊन वाढदिवसानिमित्त भेट दिली

               साखरवाडी अंतर्गत रस्ता करणे नागरी सुविधा - 20 लक्ष रु,गणेशनगर ते विठ्ठल मंदिर रस्ता कोंक्रेटी करणे- 10 लक्ष रु,पिंपळवाडी येथे म्हस्कोबा मंदिर सभा मंडप 10 लक्ष रु,साखरवाडी बाजार पेठ रस्ता डंबरीकरण करणे - 15 लक्ष रु,आंबेडकर नगर दलित वस्ती येथे रस्ता कोंक्रेटी करणे 10 लक्ष रु,साखरवाडी, पिंपळवाडी रस्ता कोंक्रेटी करणे - 10 लक्ष रु,साखरवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ता क्ररणे - 5 लक्ष रु,साखरवाडी येथे मुस्लिम समाज दफन भूमी येथे स्ट्रीट लाईट बसविणे अशा विविध विकासकामांचे उद्घाटन माढा मतदारसंघाचे खासदार रंजीत सिंह नाईक निंबाळकर,फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते ,महानंदा दूध डेअरीचे उपाध्यक्ष डि.के.पवार लोकप्रिय सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम सिंह भोसले, साखरवाडीचे सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साखरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन यावेळी पार पडले

           तसेच साखरवाडी येथे  नायब तहसीलदार कार्यालय  लवकरच सुरू होणार असून यासाठी फलटणला जाणारा साखरवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा त्रास वाचणार आहे तसेच प्रल्हादराव साळुंखे पाटील,महानंदा दूध डेअरीचे डि.के.पवार,माजी सरपंच माणिक आप्पा भोसले व लोकप्रिय सरपंच विक्रम आप्पा भोसले हे मला नक्कीच भरघोस मते मिळवून देतील असा विश्वास माढा मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला 

          ग्रामपंचायत विकासपट्टू  २०२४ चा पुरस्कार

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते   ग्रामस्थांच्या वतीने विक्रम सिंह भोसले यांना देण्यात आला शाल श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते

        साखरवाडी गावचे कार्यसम्राट सरपंच विक्रमसिंह (आप्पा) भोसले यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सर्वसामान्य बंधु भगिनी, साखरवाडीतील व्यापारी यांचे प्रेम रुपी आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहतील  तसेच साखरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना साखरवाडीतून भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचे सांगितले

            तसेच महानंदा दूध डेरीचे उपाध्यक्ष डि.के पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर त्यावेळी आपण महायुतीच्या उमेदवाराला पक्षाच्या आदेशाप्रमाणेच मदत करणार असल्याचे जाहीर केले

             या बस स्थानक आवारातील कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य अपर्णा बोडरे, दत्ता बोडरे यांनी केले होते यावेळी साखरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच अक्षय रूपनवर,मा. सरपंच माणिकआप्पा भोसले,मा डी के ग्रामपंचायत सदस्य विक्रम ढेंबरे,ग्रामपंचायत सदस्य मयूर लोखंडे, राजेंद्र पवार,संपत पवार,संभाजी जाधव,डॉ. आनंदा जाधव,अनिल कुराडे विश्वजीत भोसले,सचिन भोसले,विकी भोसले,बंटी भैया शेख, मारुती माडकर,उत्तम मोहिते,सुरेश पवार,संग्रामदादा औचरे,रवींद्र तोरणे,दिनेश रावळ,पप्पू रणवरे,गणेश पिसे वैभव पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती 

                 या वाढदिवसानिमित्त विक्रम आप्पा भोसले यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्यासह साखरवाडी परिसरातील ग्रामस्थ मित्रपरिवार,मान्यवरांनी निवासस्थानी भेटून व फोन वरून  शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त यावेळी खूप गर्दी पाहायला मिळाली

               दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून विक्रम आप्पा भोसले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments