Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्र्वरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

सह्याद्री निर्भिड न्यूज

महाबळेश्वर/चैतन्य दवे 

 महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने महाबळेश्र्वरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.


महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुका यांच्या विद्यमाने व संघटनेचे संस्थापक/ राज्याध्यक्ष मा लोक नेते संघर्ष नायक सन्माननीय भगवानरावजी वैराट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन पाचगणी  तालुका महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सुनिता ताई जाधव या होत्या या वेळी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संघटनेच्या माध्यमातून किमिन्स हायस्कूल पाचगणी येथे काम करणाऱ्या महिलांना कायम (पर्मनंट) नोकरी वर घेण्यात आलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या महीलांचाही बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलित करून व महापूरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनिता ताई जाधव सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे वाई तालुका महिला अध्यक्ष मनिषा संकपाळ सरचिटणीस शाहिद जमादार,स.सै.दल पाचगणी युनिट अध्यक्ष महेंद्र सोनावणे, वंचित महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा मोरे, वं.म.ता.अधक्ष मोहिते, समता सैनिक दल सिमा वन्ने, यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस संजय सकटे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी अवघडे, वाई तालुका अध्यक्ष प्रवीण संपकाळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेडगे ताई यांनी केले कार्य कर्माची प्रस्तावना सौ. आशा ताई वन्ने यांनी केले आभार म.रा.का.सु.दल महाबळेश्वर तालुका अध्यक्ष नितीन वन्ने यांनी केले सदर कार्यक्रमास महाबळेश्वर तालुका महिला कामगार व पाचगणी येथील स्थानिक महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमास संघटनेचे संदिप माने, सचिन कांबळे, संतोष मोहिते, प्रेम अठवाल, दिपाली सपकाळ, प्रियंका जाधव, ज्योती भोसले, वर्षा जठार, सुनिता ताई, माळवदे ताई,सुशमा वैराट, रोहिणी ताई, वैशाली जावळे, अर्चना जावळे,मनिषा जाधव, सर्व पदाधिकारी व सर्व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments