Type Here to Get Search Results !

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४



  

भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत


सातारा दि.17: भारत निवडणूक आयोग आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासुन जाहिर केली आहे.  भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांकडून जप्त केलेल्या रोख रक्कमाबाबत जनतेला व प्रामणिक व्यक्तीची गैरसोय टाळण्यासाठी आणि तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तीन अधिका-यांची समिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी  यांनी गठित केली आहे. यामध्ये प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, सातारा नोडल अधिकारी, खर्च संनियंत्रण समिती तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. सातारा आणि जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा या तीन अधिका-यांचा समावेश आहे. 

या समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील.

ही समिती पोलीस किंवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा भरारी पथकाने जप्त केलेल्या रक्कमांची प्रत्येक प्रकरणांची स्वतःहून तपासणी करील आणि अशा जप्तीबाबत कोणताही प्रथम माहिती अहवाल अथवा तक्रार दाखल करण्यात आली नसेल असे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीनुसार जप्त केलेल्या रक्कमेचा कोणत्याही उमदेवारांशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणताही निवडणूक प्रचार इ. संबध नाही, असे दिसून आल्यास, समिती अशी रोख रक्क्म ज्याच्याकडून जप्त करण्यात आली होती अशा व्यक्तींना देण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर अशी रक्कम तात्काळ परत करण्यासाठी उपाययोजना करील. समिती अशा सर्व प्रकरणांचा विचार करील आणि जप्ती बाबत निर्णय घेईल.


त्याप्रमाणे पोलीस किंवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा भरारी पथकाने जप्त केलेल्या रक्कमांसंबंधी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी जिल्हा कोषागार अधिकारी जिल्हा कोषागार कार्यालय, सातारा (दुरध्वनी क्रमांक-०२१६२ २२७७७६) येथे अपील करावे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments