Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथील श्री भवानीमाता मंदिरात श्री रामनवमी उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न!

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

साखरवाडी येथील श्री भवानीमाता मंदिरात श्री रामनवमी उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न!   


  साखरवाडी ता. फलटण जि.सातारा येथील श्री भवानीदेवी मंदिरात श्री रामनवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला.सकाळपासून पिंपळवाडी येथील श्री माऊली प्रासादिक भजनी मंडळाचे भजन , त्यानंतर जन्मकाळ, आरती , रामरक्षा पठण इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.साखरवाडी परिसरातील बहुसंख्य भाविक याप्रसंगी उपस्थित होते.सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदोत्सव मंडळाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांचे मार्गदर्शनाखाली सर्वस्वी श्री अरविंद किंकर , राजेंद्र देशपांडे , सूरज गाडे , रसिक भिसे , प्रतीक गाडे , समर्थ गाडे , शहाजी काटे , राहुल बावकर , प्रशांत रणवरे , प्रथमेश गरटकर , रमेश कुचेकर , आनंद कदम , प्रकाश महामुनी , राजेंद्र वणवे , मयूर धोत्रे , मामा जगताप इत्यादींनी उत्तम सहकार्य केले.सौ गायत्री किंकर , सौ सुषमा गाडे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments